सारा न्यूज नेटवर्क -
प्रथमेश इंगळे, शिवाचार्य व स्वामीजींच्या उपस्थितीत अफजलपूर - श्रीक्षेत्र हिरेजेवर्गी येथील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठच्या नव्या वास्तूचे शुभारंभ.
श्री शांतलिंगेश्वर महाशिवयोगी यांच्या सिंहासनावर शिवलिंगाची भक्तीभावात प्रतिष्ठापना.
अफजलपूर (श्रीशैल गवंडी, दि.०६/०५/२६) :-
अफजलपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र हिरेजेवर्गी येथील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठच्या नव्या वास्तूचे शुभारंभ आज मोठया भक्तीभावात झाला. यावेळी
श्रीशैल श्रीपीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धाराम पंडितराध्य शिवाचार्य भागवतपद तसेच काशी श्रीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य भागवतपद यांच्या दिव्य सान्निध्यात अफजलपूरचे विश्वराध्य मलेंद्र शिवाचार्य, चौडापूरचे सिद्धराम शिवाचार्य, गौरा बु.चे कैलासलिंग शिवाचार्य, हिरेअल्लगीचे शांतलिंग शिवाचार्य, अक्कलकोटचे बसवलिंग महास्वामी, मुगळीचे भोगेश्वर महाराज, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र व युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने हिरेजेवर्गी मठाचे मठाधिपती श्री जयगुरुशांत लिंगाराध्य शिवाचार्य यांचा प्रथमेश इंगळे यांनी श्री.स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला तर हिरेजेवर्गी मठाच्या वतीने मठाधिपती श्री जयगुरुशांत लिंगाराध्य शिवाचार्य यांनी प्रथमेश इंगळे यांचा आशिर्वाद देवून सन्मान केला. आज ब्रह्म मुहूर्तावर संपन्न झालेल्या श्री शांतलिंगेश्वर सिंहासनावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना, कलशारोहण व धर्मसभेस महेश इंगळे- प्रथमेश इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कडगंची येथील श्री वीरभद्र शिवाचार्य होते. यावेळी अक्कलकोटचे पत्रकार विरुपाक्ष कुंभार, रमेश शिंदे सर, श्रीशैल गवंडी, सुनिल पवार, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment