b>सारा न्यूज नेटवर्क -
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन व
श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर येथे ध्वजारोहण.
अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी,दि.०१/०५/२६)
आज महाराष्ट्र दिनानिमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित ए वन चौक येथील
श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर व मैंदर्गी रोड वरील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी ०८:०५ व ०८:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिशू बालक व विद्यार्थ्यांना चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्राचार्य नागनाथ जेऊरे सर, प्रा.शिवशरण अचलेर, स्वाती गाडे, सदिच्छा कदम, उमेश सोनवणे, बंटी नारायणकर, मगदूम, अरवतकर, कडबगावकर, काशिनाथ इंडे, संजय पवार, सागर गोंडाळ, संजय मोरे,
सुनिल पवार, बाळासाहेब एकबोटे व स्टापचे इतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना देवस्थानच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Friday, May 1, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment