Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 22, 2026

SARA NEWS NETWORK

 



सारा न्यूज नेटवर्क - 

मुलं सांभाळत नसल्याची पित्याची पोलिसात तक्रार;

 मंद्रुप पोलीस ठाण्यात दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल... 


दक्षिण सोलापूर ( प्रतिनिधी) :-  मुलं शेतजमिनीचे उत्पन्न घेतात, मात्र माझा सांभाळ करत नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली असून गावात लोकांकडे मागून खावे लागत आहे,” अशी वेदनादायक तक्रार एका ८० वर्षीय वृद्ध पित्याने मंद्रुप पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे घडली आहे. पांडुरंग बाबूराव गुंड (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर) असे तक्रारदार वृद्ध पित्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची दोन मुले बिरूदेव गुंड आणि दिनेश गुंड यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, २०२४ पासून दोन्ही मुलांकडून त्यांचा सांभाळ केला जात नाही. शेतजमिनीचे उत्पन्न मुलांकडून घेतले जात असले तरी वृद्ध पित्याला अन्न, औषधोपचार आणि आवश्यक मदत दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आजारी अवस्थेतही मुलांनी उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी गावात लोकांकडे मागून खाण्याची वेळ आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी मंद्रुप पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment