Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 23, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

निस्सीम श्रद्धा, विश्वास आणि सेवेद्वारे स्वामींची कृपादृष्टी प्राप्त होते -  अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे 

श्री स्वामी दर्शनानंतर अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे यांचे मनोगत.

अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे यांचा नगरसेवक - चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.

अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.२३/०५/२६) :-

          श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी स्वामींचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. सात्विक वर्तन, सात्विक आहार यांचे जीवनात विशेष महत्व आहे. खोटे बोलणे टाळावे आणि गुरुवारी स्वामींची विशेष सेवा करावी.

अशी जीवनशैली प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. यातून मनुष्याच्या अंगी निस्सीम सेवाभाव उद्भवते. अशा सेवा भावाने स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा दृष्टीचा वर्षाव करतात, म्हणून निस्सीम श्रद्धा, विश्वास आणि सेवेद्वारे श्री स्वामींची कृपादृष्टी प्राप्त होते असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे यांनी व्यक्त केले. त्या नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. 



यावेळी अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे या स्वामी भक्ती संदर्भात बोलत होत्या.

पुढे बोलताना अप्पर पोलीस महासंचालक अश्विनी दोरजे यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीची भक्ती, सेवा आणि उपक्रम या ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे अवतार कार्य आहेत. मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नावात व व्यक्तीमत्वात ब्रम्हा, विष्णू, महेशाची सेवाभावी विनम्रता ही ठासून भरलेली आहे. यानिमीत्ताने श्री स्वामी समर्थांच्या या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्ती, सेवा, उपक्रम या कार्यांची धुरा समर्थपणे पेलण्यास महेश इंगळे यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत, या सोबतच आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी नेहमीच असल्याचे मनोगत व्यक्त केले. मंदीर समितीच्या वतीने येथे करण्यात आलेले आदरतिथ्य व श्री स्वामी दर्शनाची व्यवस्था पाहून नगरसेवक व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले.

 यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक दिपक भिंताडे, चिललावार, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे




No comments:

Post a Comment