Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, May 10, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 प्रसाद जगताप यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार 


सोलापूर (प्रतिनिधी) - दैनिक 'अबतक' वृत्तपत्राचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जगताप यांचा वाढदिवस सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


पोलीस मित्र सोशल फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन जगताप यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


या कार्यक्रमास पोलीस मित्र सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा संघटक कलीम शेख, उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, शहर अध्यक्ष अंबादास गज्जम, कार्याध्यक्ष रशीद शेख, सचिव गणेश निंबाळकर, उपाध्यक्ष रमेश दग्गारी, संघटक अतुल भडंगे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले यांच्यासह अरुण सिडगिद्दी, अमोल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment