सारा न्यूज नेटवर्क -
डॉ. योगेश पल्लोलू यांची जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाच्या सहखजिनदारपदी निवड; दिशा संस्थेतर्फे सत्कार..
सोलापूर : - दिशा सामाजिक मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या वतीने दि. 17 मे 2026 रोजी बापूजी नगर येथील देवी तायम्मा मंदिरात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग, कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पल्लोलू यांची श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ, शहर व जिल्हा सोलापूर च्या सहखजिनदार पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सल्लागार सदस्य मा. विठ्ठल तलवारे व मा. सिद्राम म्हेत्रे (टायगर) यांच्या हस्ते डॉ. पल्लोलू यांना शाल व फुलहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. पल्लोलू यांच्या भावी समाजोपयोगी व विधायक कार्यास संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा. नरसिंग पंधीरोलू (शेगुंठा), सेक्रेटरी मा. नरसिंग मिसालोलु, खजिनदार मा. लक्ष्मण मिसालोलु तसेच राजू पेद्दी, अंबादास मुठ्याल, नरसिंग सानेपागोलू, अंजप्पा सज्जन आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. योगेश पल्लोलू यांनी यापूर्वीही आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरी आरोग्य केंद्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या निवडीबद्दल समाजातून आनंद व्यक्त होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे

No comments:
Post a Comment