सारा न्यूज नेटवर्क -
वनअपराधीच रक्षक..? सोलापुरात खळबळ..!
वनअपराधीच बनला वन्यजीव रक्षक..!
पुणे वनसंरक्षकांचे चौकशीचे आदेश
मुंबई - सोलापूर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक पदी वनअपराधाची नोंद असलेल्या व्यक्तीची नियुक्ती झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण:
1. सोलापूरच्या जी.आय.बी संस्थेचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी याबाबत तक्रार केली होती. 2. नव्याने नेमलेल्या मानद वन्यजीव रक्षकावर 2022 साली गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी एक मोर व दोन पोपट बेकायदेशीररित्या ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती. 3. देखभाल व उपचारासाठी पक्षी ठेवल्याची सबब त्यांनी दिली होती, मात्र वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
दबावतंत्राचा आरोप:
सोलापूर वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दबावामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील कारवाई:
वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सोलापूर वन विभागाला पत्र पाठवून नियमानुसार चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment