Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 20, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापुरात मध्यरात्री घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- दि.०४/०५/२०२६ रोजी रात्रौ ०९:०० वा. ते दि. ०५/०५/२०२६ रोजी सकाळी ०७:०० वा. चे दरम्यान फकीरा चौक न्यु बुधवार पेठ सोलापूर येथील दोन ठिकाणी बंद घराचे कडी कोयंडा उचकटून, कुलूप तोडून, तेथील घरांमध्ये कपाटात ठेवलेली रोख रक्कम रु. १७,५००/- व एक लहान मुलाचे कानातील बाली असा एकुण ४७,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी नेल्याने त्यांचे निदर्शनास आले. सदर बाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारींवरून (१) जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गु.र.नं. ४३७/२०२६ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१ (४) प्रमाणे व (२) गु.र.नं. ४३९/२०२६ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१ (४) प्रमाणे घरफोडी-चोरीचे ०२ गुन्हे दाखल आहेत.



सदर रात्रीच्या वेळी घरफोडीच्या दोन घटना, न्यु बुधवार पेठ परिसरात एकाच रात्री घडल्या होत्या, घटनांचे गांर्भिय ओळखुन, वपोनि गुन्हे शाखा, श्री. अरविंद माने साहेब, सपोनि शैलेश खेडकर, सपोनि श्री. जे. व्ही गळवे व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे, सपोनि श्री. शैलेश खेडकर व पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली. तसेच सपोनि श्री. जे. व्ही गळवे व त्यांचे पथकाने कौशल्याने तांत्रीक माहिती मिळविली. प्राप्त माहितीच्या आधारे, सदर आरोपीतांचा शोध घेत असताना, दि. १२/०५/२०२६ रोजी सपोनि शैलेश खेडकर, यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे, पथकाने पुणे शहरात जावून, आंतरजिल्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी नामे, (१) दिपक बाळू ढेरंगे वय-३४ वर्षे, व्यवसाय :- मजूरी रा. ढेरंगे वस्ती, कोरेगांव भिमा, ता. शिरुर जि. पुणे (२) दत्ता अरुण कदम वय-३८ वर्षे, व्यवसाय :-मजूरी, रा. १०२, माऊली मंगल कार्यालयाचे समोर, अभिनव कॉलेज रोड, न-हे, ता. हवेली जि.पुणे (३) आकाश सुर्यकांत आंग्रे वय-२९ वर्षे, व्यवसाय मजूरी रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी गॅस गोडावून जवळ, पुणे (४) साहेबराव लक्ष्मण बेंडूरे वय-५३ वर्षे, व्यवसाय चालक रा. नवागांव दहिसर वेस्ट, मुंबई यांना पुणे येथे ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचेकडील मारुती सुझुकी इको कारमधून पुणे येथून सोलापूरात येवून, वरील नमुद दोन घरे, एकाच रात्री फोडल्याची कबूली देवून, संगनमताने गुन्हा केल्याचे मान्य केले.


सपोनि शैलेश खेडकर व पथकाने गुन्हयाचे तपासात आरोपींकडून, रोख रक्कम रु. १५,०००/- रुपये ३०,०००/- किंमतीचा सोन्याचा एक दागिना व गुन्हा करणेकामी आरोपींनी वापरलेली कार, असा एकुण ४,९५,०००/-(चार लाख पंच्यान्नव हजार /-) रुपये किंमतीचा पैवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत करुन, रात्रीच्या वेळी घडलेले घरफोडीचे दोन गुन्हे अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणले आहेत. यातील आरोपी दिपक बाळासाहेब ढेरंगे याचेवर मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र जवळ बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दत्ता अरूण कदम याचेवर फसवणुक, खंडणी, अपघात यासारखे गुन्हे दाखल आहेत. यातील अटक आरोपी दिपक ढेरंगे व दत्ता कदम या दोघांवर यापूर्वी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत अनुक्रमे अहिल्यानगर पोलीस व पुणे शहर पोलीस यांनी कारवाई केलेली आहे.


सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) तसेच श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर, सपोनि जे. व्ही गळवे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, दिपक जाधव, मंजूनाथ मुत्तनवार, राजेश मोरे, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment