सारा न्यूज नेटवर्क -
जुनी मिल ट्रस्टच्या व उड्डाणपूलास दिलेल्या जागांवर अतिक्रमण व अवैध बांधकाम केल्याबद्दल कुमार करजगी, यशराज करजगी यांच्याविरुद्ध पोलिसात व महानगरपालिकेत तक्रार दाखल .
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे व ज्युनिअर इंजिनिअर विक्रम सिंह पाटील यांनी बोगस कागदपत्रांवर दिले होर्डिंग साठी परवाने.
सोलापूर :- जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ,सोलापूर या ट्रस्टच्या मोतीबाग टी.पी. नं. ३, फायनल प्लॉट नं. ८३ व ८४ व जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठे येथील टी.पी. नं.४ फायनल प्लॉट नं. १२५/२ या जागांवर कुमार शंकर करजगी ,यशराज नागेश करजगी ,सोमनाथ करजगी व सुरेंद्र कर्णिक यांनी खोट्या व बोगस कागदपत्रांवर ना हरकत प्रमाणपत्र व खोटे प्रतिज्ञापत्र देऊन अतिक्रमण करून अवैध बांधकामे केलेली आहेत. जुनी मिल कंपाऊंड येथे यशराज लॉन्स अँड हॉल, यशराज कॅन्टीन व कंबर तलाव जवळ यशराज चौपाटी, यशराज मोटर्स अँड ऑटो कन्सल्टंट, सवेरा कार सर्विसेस, सुरभी आईस्क्रीम ज्यूस, सुरभी कार स्पा ,कॅफे डायमंड किंग, समीर प्लायवूड लॅमिनेट, आशा फर्निचर ,यशराज एम एस टायर्स,यशराज गादी सेंटर, आस्क मोटर्स, रूमा कार वर्ल्ड ,टर्फ एरिना, नॅशनल मोटर्स ,इंडिया मोटर्स, खिलौना मोटर्स, ब्रह्माकुमारी यांनी अवैधपणे कब्जा करून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत.
जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलामध्ये ट्रस्टची बाधित होणारी कंबर तलाव येथील वरील काही जागा संस्थेचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी २०२४ मध्ये महानगरपालिकेस हस्तांतरित केलेली आहे. याच जागेवर वरील सर्व अतिक्रमणे व अवैध बांधकामे झालेले आहेत. वरील ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड व मोतीबाग, कंबर तलाव येथे महानगरपालिकेच्या आरक्षित जागांवर सुद्धा ही अवैध बांधकामे व अतिक्रमण झालेले आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आयुक्त व भूमी व मालमत्ता विभागास वारंवार डॉ. संदीप आडके यांनी तक्रारी करून सुद्धा बोगस कागदपत्रांवर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे व ज्युनिअर इंजिनिअर विक्रम सिंह पाटील यांनी संगनमताने जुनी मिल ट्रस्टच्या जागेमध्ये १६ अनधिकृत होर्डिंग उभारण्यास सद्गुरु ऍडव्हर्टाईस चे अतुल विभूते व शुभम एंटरप्राइजेस चे किशोर कृष्णहरी रच्चा यांना बोगस होर्डिंग परवाने दिलेले आहेत.
महानगरपालिकेचे अधिकारी असा भ्रष्टाचार करत असतील व महानगरपालिका व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर येथील उड्डाणपूल कसे होणार? असा सवाल डॉ. आडके यांनी केलेला आहे.
कुमार शंकर करजगी ,यशराज करजगी, बोगस परवाने देणारे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, विक्रम सिंह पाटील व सर्व अतिक्रमण धारकांवर तात्काळ फौजदार कारवाई करावी व अतिक्रमणे काढावी अशी तक्रार जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूरचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी महानगरपालिका आयुक्त, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख ,पोलीस आयुक्त व सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे.
विशेष म्हणजे कुमार शंकर करजगी व सुरेंद्र कर्णिक हे जुनी मिल भूखंड घोटाळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या जामिनावर बाहेर आहेत व या जागांचे व्यवहार करू नयेत अशी त्यांना सक्त ताकीद असताना सुद्धा उच्च न्यायालयाच्या अटींचा भंग करून त्यांनी या जागा बोगस पद्धतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत.
डॉ.संदीप आडके. (9822807007)
सचिव, जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment