Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 23, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रभाग २६ मधील उखडलेले रस्त्या समस्या बाबतीत सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन. 

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू. 

सोलापूर :- जुळे सोलापूर व प्रभाग क्रमांक 26 मध्ये लक्ष्मी कंट्रक्शन कडून ड्रेनजचे कामे केली आहेत परंतु रस्ते खोदून ठेवलेले आहेत.इस्टिमेट प्रमाणे सदर रस्ते आहे त्या स्थितीत करून देणे क्रमप्राप्त असताना खालील ठिकाणी ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क, कृष्णा कॉलनी, शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्त नगर भाग १ ते ५, हेरिटेज फ्रॉम, प्रियांका नगर, पंचवटी नगर, विश्व नगर, रोहिणी नगर भाग १, येथे रस्ते अद्यापही डांबरीकरण व काँक्रिटीकरण केलेले नाहीत सदरचे रस्ते पावसाळ्यापूर्वी करणेबाबत निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेता नरेंद्र काळे, यांना लेखी निवेदन दिले असून सदर कामे पावसाळ्यापूर्वी न केल्यास जुळे सोलापूर मधील नागरिकांना घेऊन सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब यांनी समक्ष संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना फोनवरून सूचना दिल्या आहेत की येत्या आठवडाभरात सदरची कामे तातडीने  करून घेणे बाबत आदेश दिले असून लवकरच सदरचे रस्ते  दुरुस्त करून देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी प्रभागातील विविध समस्या बाबतीत अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment