Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 27, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूरचे पंचमुखी हनुमान मंदिर हे अनेक भाविकांसह आमचेही श्रद्धास्थान - नगरसेवक महेश इंगळे 

पंचमुखी हनुमान मंदिरच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार 


सोलापूर (श्रीशैल गवंडी, दि.२७/०५/२६) :-

      सोलापूर आसरा येथील पंचमुखी हनुमान मंदीर हे अनेक भाविकांसह आमचेही श्रद्धास्थान असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टींचे नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतंच सोलापूरच्या 

पंचमुखी हनुमान देवस्थानास नगरसेवक महेश इंगळे यांनी भेट देऊन पंचमुखी हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. 

यावेळी देवस्थानाचे सचिव नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी शाल, श्रीफळ व प्रतिमा देऊन नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना 

नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री पंचमुखी हनुमान हे नवसाला पावणारे मारुतीराया आहेत. भारतात अशी मूर्ती फार कमी ठिकाणी आहे. हनुमानाची ५ तोंडे ५ वेगवेगळ्या देवतांचे प्रतीक आहेत.


पूर्व मुख संहाराचा नाश करतो, दक्षिण मुख भय आणि संकट दूर करतो,

पश्चिम मुख गरु, सर्पबाधा, विषबाधा नाहीशी करतो, उत्तर मुख वराह ग्रहपीडा, दारिद्र्य दूर करतो, ऊर्ध्व मुख विद्या आणि ज्ञान देतो अशी माहिती देऊन 

रामायणात अहिरावणाला मारण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप घेतलं होतं शा मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होणं हे माझं भाग्य आहे असेही मनोगत नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी पंचमुखी हनुमान मंदीराचे पदाधिकारी, रमेश शिंदे सर, संतोष जाधव फुटाणे सर व अन्य उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment