सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरमध्ये शिवसेनेला बळ;
प्रा.डॉ.सुभाष गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..
सोलापूर : शिवसेना पक्षाच्या शिव उद्योग सहकार सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा.डॉ. सुभाष खंडेराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या . शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी डॉ. सुभाष गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रदेश अध्यक्ष रामेश्वर प्रभतराव वाडेकर यांनी नियुक्तीपत्राद्वारे प्रा.डॉ. गायकवाड यांना शुभेच्छा देत पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रत्येक महिन्याचा कामाचा लेखी अहवाल प्रदेश अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष यांना सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम बाळासाहेब भवन घेण्यात आला
या नियुक्तीप्रसंगी शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री.रामेश्वर वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री . चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री श्री.पांडुरंग पाटील, श्री प्रशांत पालांडे, पुणे जिल्हा प्रमुख श्री.विजय पवार, सांगली जिल्हा प्रमुख श्री.कुलदीप देवकुळे, सोलापूर जिल्हा प्रा. डॉ. श्री एस. के. गायकवाड, सोलापूर जिल्हा उपाध्यक्षश्री .विश्वनाथ सोमवंशी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री.राजू माशाळकर, सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ .उषा गायकवाड, मिरज तालुका अध्यक्ष श्री. राहुल खांडे, सांगली-मिरज महानगरपालिका अध्यक्ष श्री.गणेश माळगे तसेच कार्याध्यक्ष श्री.संग्राम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ. श्री.सुभाष गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात शिव उद्योग सहकार सेनेची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे

No comments:
Post a Comment