Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, May 21, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क

 सोलापुरात भारतातील पहिला DME प्लांट सुरू, बालाजी अमाइन्सची ऊर्जा क्षेत्रात क्रांती


सोलापूर :-  20 मे 2026 - सोलापूरच्या चिंचोळी MIDC मध्ये बालाजी अमाइन्स लिमिटेडने भारतातील पहिला कमर्शियल डायमिथाइल ईथर (DME) प्लांट सुरू करून इतिहास रचला आहे. 20 मे रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या हस्ते या अत्याधुनिक प्लांटचे उद्घाटन झाले.

125 एकरवर ₹800 कोटींची गुंतवणूक करून उभारलेल्या या प्लांटची क्षमता 300 टन प्रतिदिन म्हणजेच 1 लाख टन वार्षिक आहे. DME हे स्वच्छ इंधन असून LPG ला पर्याय म्हणून वापरले जाते. युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये LPG मध्ये 20% DME मिसळण्याची पद्धत आधीपासूनच आहे.



प्रेस कॉन्फरन्समध्ये राम रेड्डी म्हणाले, "भारत LPG आयातीवर अवलंबून आहे. DME च्या वापराने आयात कमी होईल आणि ऊर्जा स्वावलंबन वाढेल." कंपनीने गोल्फ कार्टमधून पत्रकारांना प्लांट टूर दिली. मागे उंच डिस्टिलेशन कॉलम्स आणि स्टोरेज टाक्या दिसत होत्या.

सुरुवातीला हॉटेल्स, बेकरी, सिरॅमिक उद्योगांना 500 किलोचे सिलेंडर पुरवले जातील. DME वेल्डिंग, कटिंग आणि बल्क हीटिंगसाठी उपयुक्त आहे. कच्चा माल मिथेनॉल कंपनी स्वतः बनवते.


या प्लांटमुळे सोलापूर देशाच्या ऊर्जा नकाशावर आले असून शेकडो रोजगार निर्माण होणार आहेत. 'मेक इन इंडिया'ला बळकटी देणारा हा प्रकल्प स्वच्छ इंधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment