सारा न्यूज नेटवर्क -
N.G. मिल चाळीत लोकमंगल परिवारातर्फे आरोग्य शिबीर संपन्न; 51 रुग्णांची तपासणी
सोलापूर :,- 16 मे 2026: SMC आरोग्य विभाग आणि आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या लोकमंगल परिवाराच्या संयुक्त विद्यमाने NGMILL चाळ, श्री बाल हनुमान मंदीर येथे आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य अधिकारी Dr. राखी माने यांच्या आदेशानुसार झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात एकूण 51 रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. यावेळी गरजू रुग्णांची रक्त तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांची रक्तातील साखर तपासणी करण्यात आली. तसेच सर्व उपस्थित रुग्णांची मलेरियासाठी PS तपासणीही करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंगू व मलेरिया या आजारांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देऊन प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रमुख वैद्यकीय अधिकारी Dr. Pallolu Y. H. यांच्यासह दंत चिकित्सक Dr. Supriya Patil आणि नेत्र सहाय्यक Shete यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी GNM आशियाबी शेख, MPW अमित कांबळे, Peon नागेश चांद्री व सफाई कामगार सपना जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
लोकमंगल परिवाराच्या या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना घराजवळच मोफत उपचार मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment