सारा न्यूज नेटवर्क -
वळसंग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी;
प्रवासी महिलेची हरवलेली पर्स मुद्देमालासह सुखरूप परत..
वळसंग (प्रतिनिधी) :- सोलापूरहून वळसंगकडे स्वारगेट–गुलबर्गा बसने प्रवास करणाऱ्या फातिमा गुडू शेख (वय 65, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) यांची पर्स वळसंग बसस्टॉप येथे उतरल्यावर हरवली होती. याबाबत त्यांनी वळसंग पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल यादव व महिला पोलीस हवालदार अनिशा पटेल यांनी तातडीने कार्यवाही करत अक्कलकोट बस आगारातील एस.टी. कंट्रोलर अंबाना कोळी यांच्याशी संपर्क साधला. संबंधित बस अक्कलकोट डेपो येथे थांबवून तपासणी करण्यात आली असता महिलेची पर्स मिळून आली.
सदर पर्समध्ये मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच अंदाजे 8 ग्रॅम सोन्याचे बोरमाळ आणि इतर वस्तू सुरक्षित अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणून संबंधित महिला प्रवाशांना सुखरूप परत करण्यात आला.
पोलिस कर्मचारी व एस.टी. प्रशासनाच्या तत्परता आणि सतर्कतेमुळे ही कार्यवाही यशस्वी झाली असून महिला प्रवाशांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे
No comments:
Post a Comment