Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 23, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीदवाक्य भाविकांना धीर देतात - न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोणसले 

अक्कलकोट (श्रीशैल गवंडी दि.२३/०५/२६) :-

            भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीदवाक्य हे भाविकांना धीर देतात असे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच चे न्यायमुर्ती रणजीतसिंह राजा भोणसले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.



 यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोणसले यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोणसले बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती रणजीतसिंह राजा भोणसले यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान असून हे स्थान भाविकांसाठी भक्ती व शक्तीचं प्रेरणास्थान आहे. मंदीर समितीचे भाविकांप्रती असलेले आदरतिथ्य या उपक्रमांमुळे स्वामी भक्तांच्या या भावनेला आणखीन बळकटी प्राप्त होते. आज येथे झालेल्या आमच्या आदर तिथ्यांमुळे स्वामींवरील श्रध्देय भक्तीभावास आमचे जीवन ही पात्र ठरणार आहे त्यामुळे आम्ही भोणसले कुटूंबीय ही मंदीर समितीच्या आदर तिथ्यामुळे धन्य झालो आहे असेही मनोगत न्यायमुर्ती रणजीतसिंह राजा भोणसले यांनी व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट न्यायालयाचे न्यायमुर्ती कल्याणकर साहेब, विश्वस्त संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, स्वप्निल मोरे आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment