सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरकरांनो, जागृत व्हा.! प्रॉपर्टी टॅक्स 4 पट वाढणार..?
प्रकाश राठोड यांचा इशारा: एकत्र या, विरोध करा..!
नागरिकांनी एकत्र येऊन विरोध करुन, महानगरपालिकेपर्यंत आपला आवाज पोहोचवावा - प्रकाश राठोड विशेष कार्यकारी अधिकारी
सोलापूर :- सोलापूरकरांनो, जागृत व्हा.. अन्यथा प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपाने तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागेल. सोलापूर महानगरपालिका भांडवली मूल्यवर्धित कर लावण्याची हालचाली सुरू आहे. सध्या महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊन नागरिकांवर न परवडणारा कर लादण्याची तयारी आहे.
सोलापूर महानगरपालिका नागरिकांना सुविधा देताना कमी पडत आहे. रस्ते, लाईट, पाणी, साफसफाई आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात ती अपयशी ठरत आहे. हद्दवाढ भागांमध्ये आजही कोणताही विकास झालेला नाही.
महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असल्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांवर करांच्या रूपाने एकतर्फी भुर्दंड लादले जात आहेत.
*भांडवली मूल्यवर्धित कर, (Capital Value Increment Tax)* लवकरच लावण्याची हालचाल सुरू झाली आहे. हा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर आहे.
*सध्या सोलापूर महानगरपालिकेची कर प्रणाली अशी आहे – Annual Rental Value (ARV)*
या करप्रणालीअन्वये प्रॉपर्टी टॅक्स काढला जातो. प्रॉपर्टी टॅक्स लावताना क्षेत्र, लोकेशन, वापर, बांधकाम प्रकार, झोन आणि स्लॅबनुसार ARV/एरिया बेस्ड व्हॅल्यू यावर कर लावला जातो.
*भांडवली मूल्यवर्धित कर म्हणजे काय?*
कॅपिटल व्हॅल्यू सिस्टिममध्ये प्रॉपर्टीचा कर हा तिच्या सध्याच्या बाजारभावावर किंवा रेडी रेकनर दरावर ठरवला जातो.
*नागरिकांना न परवडणारा भांडवली मूल्यवर्धित मालमत्ता कर*
बाजारभाव वाढले की कर थेट वाढतो, त्यामुळे बिल मोठे येते. मालमत्ता कर सतत वाढत राहणार असल्यामुळे या पद्धतीला नागरिकांचा विरोध होतो.
ही भांडवली मूल्यवर्धित कर प्रणाली महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी फक्त १-२ महानगरपालिकांनी लावली आहे.
सोलापूर महापालिकेतील सर्व नागरिकांनी जागृत होऊन याला विरोध करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरावे लागेल. आपण निवडून दिलेले नगरसेवक, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना निवेदन देऊन “हा कर लावू नये, आमचा विरोध आहे” हे ठणकावून सांगावे लागेल.
आपल्या हक्कांसाठी लढा देणे गरजेचे आहे. नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करावा आणि महानगरपालिकेपर्यंत आपला आवाज पोहोचवावा.
श्री. प्रकाश राठोड
मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे
No comments:
Post a Comment