Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 22, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

GK संस्थेमार्फत श्रावण बाळ योजनेचे मंजुरी पत्र प्रदान.. 

सोलापूर, दि. २२ मे २०२६ : - GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था, सोलापूर यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य पार पडले. 


संजय गांधी निराधार योजना, शहर कार्यालय सोलापूर यांच्या माध्यमातून लाभार्थी श्री. अनिल नागनाथ विटकर यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा रु. 1500/- इतके अनुदान मंजूर करण्यात आले. 



GK संस्थेच्या वतीने सदर मंजुरीचे पत्र आज संस्थेचे अध्यक्ष मा. संतोष दादा गायकवाड यांच्या हस्ते श्री. अनिल नागनाथ विटकर यांना प्रदान करण्यात आले. संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात यश आले.


यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष दादा गायकवाड म्हणाले, "गरजू, निराधार व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे. श्री. विटकर यांना नियमित अनुदान सुरू झाल्याचा आनंद आहे. पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम सुरू राहतील."

लाभार्थी अनिल नागनाथ विटकर यांनी GK संस्थेचे व अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांचे आभार मानले.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment