सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..
सोलापूर, दि. २२ जुलै २०२६ : - जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता पत्रकार कृती समितीचे सदस्य अस्लम नदाफ, प्रेस मीडिया न्यूजचे संपादक प्रवीण पारवे तसेच आरटीआय कार्यकर्ते बापू ताज पटेल यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचा शाल, टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन करजोळे, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, डॉ. राम हुंडारे, सिद्धार्थ भंडकुबे, रविंद्र जाधव, सिद्धू पुजारी, सुरज रजपूत, जहिर नदाफ, फिरोज पटेल, मंथन लकडे, महिबूब सोमजाळ, कुणाल भिसे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
💐 सत्कारमूर्तींना हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐



No comments:
Post a Comment