सारा न्यूज नेटवर्क -
अभिनेत्री अभिज्ञा बर्वे यांनी कुटुंबासमवेत घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
मंदिर समितीकडून श्रीशैल गवंडी यांच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन अभिनेत्री अभिज्ञा बर्वे यांचा सत्कार.
अक्कलकोट ( प्रतिनिधी दि. ३०/०७/२६) :-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा बर्वे यांनी कुटुंबासह आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीशैल गवंडी यांनी अभिनेत्री अभिज्ञा बर्वे व कुटूंबियांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना अभिज्ञा बर्वे म्हणाल्या की स्वामींच्या दरबारात पाऊल टाकताच मनाला अपार शांती मिळते. वटवृक्ष मंदिरातील वातावरण खूप पवित्र आणि ऊर्जा देणारे आहे. इथे होणारी स्वामी भक्ती व सेवा ही खरोखरच अनुकरणीय आहे. हजारो भक्तांना रोज स्वामी दर्शनाचा मोफत लाभ मिळतो ही खुप मोठी सेवा आहे. मंदिर व्यवस्थापनाचे आणि चेअरमन महेश इंगळे यांचे मनापासून आभार. स्वामींचा आशीर्वाद सर्वांवर राहो अशीच प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी दर्शनासाठी आलेल्या इतर भक्तांनीही अभिनेत्रीला पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, संजय पवार, विपुल जाधव, सागर गोंडाळ आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.


No comments:
Post a Comment