Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, July 20, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

बार्शीच्या सुपुत्राची IIT ला गवसणी.!

मांडेगावच्या आदित्य मिरगणेची IIT रोपार (पंजाब) मध्ये निवड..


प्रतिनिधी :- बार्शी तालुक्यातील मांडेगांवचे सुपुत्र,वारकरी शेतकरी कुटुं‌बातील विदयार्धी असताना प्रयत्न व चिकाटीच्या जोरावर जेईई या परिक्षेत यश मिळविले.


आदित्यचे प्राथमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल बार्शी व माध्यमिक शिक्षण श्री. संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा कोल्हापूर तर 11 वी 12 वी नारायणा ज्युनिअर कॉलेजेस हैद्राबाद या ठिकाणी झाले.  


 जेईई अँडव्हॅन्स परिक्षेत सर्वसाधारण गटात 8321 रॅन्क घेऊन भारतीय प्रौद्योगिकी संस्था रोपर (पंजाब) (IIT ROPAR ) या ठिकाणी निवड झाली.

या वेळी पत्रकार भिमराव दळवी यांनी शुभेच्छा देताना सांगितले ग्रामीण भागातुन असे अनेक विद्यार्थी तयार झाले पाहिजे विद्यार्थी यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते .

त्याबद्‌दल गावचे सरपंच, उपसरपंच बबन तात्या मिरगणे, पोलीस पाटील राहूल मिरगणे प्रतिष्ठित नागरिक अरुण नाना मिरगणे प्राध्यापक सतिश मिरगणे सर क्रिडा शिक्षक मल्लिकार्जुन मिरगणे सर प्रगतशील बागायतदार राहूल मिरगणे लक्ष्मण मिरगणे व आय टी इंजिनिअर कैलास मिरगणे व बहुजन आवाज न्युज चॅनल बार्शी ता अध्यक्ष पत्रकार भिमराव दळवी अदिनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .




No comments:

Post a Comment