Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, July 24, 2026

SARA NEWS NETWORK



  सारा न्यूज नेटवर्क - 

जनता संघर्ष न्यूज आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.. 

दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधीपदी द्रौपदी हाले व स्नेहल बशेट्टी यांची नियुक्ती.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :-


जनता संघर्ष न्यूज आयोजित "इयत्ता दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा सन्मान सोहळा–२०२६" हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्राचार्य डॉ. नसीम पठाण, अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे व सौ. शुभांगी दर्गोपाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, समाजोपयोगी संस्था-संघटना आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ट्रॉफी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीच्या प्रतिकृतीचे विशेष पेन देऊन गौरव करण्यात आला.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागतगीत सिद्धार्थ भडकुंबे व लक्ष्मी नागणसुरे यांनी सादर केले. प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर आभार श्रीकांत हाले यांनी मानले.

यावेळी रॉबिन हूड आर्मी, प्रयास फाउंडेशन, क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठान, सुचंद्र मागासवर्गीय चॅरिटेबल ट्रस्ट, बी.एस. फाउंडेशन, मैत्री सोशल फाउंडेशनसह विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच आनन्या कुलकर्णी, स्वरा पाटील, प्रणव धुमाळ यांच्यासह दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. किरण बंडगर, पूजा हर्डीकर आणि पत्रकार अशोक सोनकंटले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


याच कार्यक्रमात जनता संघर्ष न्यूजच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधीपदी द्रौपदी हाले व स्नेहल बशेट्टी यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी जनता संघर्ष न्यूजच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम शिक्षण व समाजसेवेला प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गायत्री हाले, श्रीकांत हाले, द्रौपदी हाले, स्नेहल बशेट्टी, प्रतीक चिंदरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment