सारा न्यूज नेटवर्क -
शिवसाक्ष सक्षम महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अश्विनी हत्तुरे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई बिराजदार बिनविरोध
धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) :- येथील नव्याने नोंदणी झालेल्या शिवसाक्ष सक्षम महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितच्या संचालक मंडळाची पहिली सभा सहाय्यक सहकार अधिकारी सुनील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अध्यक्ष (चेअरमन) व उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदाची निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी अश्विनी हत्तुरे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मीबाई बिराजदार यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सभाध्यक्ष सुनील माने यांनी जाहीर केले.
यावेळी सहाय्यक सहकार अधिकारी सुनील माने यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून पतसंस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अश्विनी हत्तुरे व उपाध्यक्ष लक्ष्मीबाई बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पतसंस्थेचे मार्गदर्शक शिवानंद हत्तुरे, संचालिका ज्योती बंडगर, द्रौपती गाडेकर, गीता सण्णके, बनशंकरी नवले, रेवती तोळणुरे, उज्ज्वला तळळीकर, नेत्रा म्हेत्रे, राणी चांगले, सुनीता फताटे, सरस्वती कोटे, सुनीता वळसंगे, अनुराधा कराजगे तसेच किरण नंदुरकर, दयानंद बिराजदार, पंडित करजगे, सचिन जोकारे, रेवण पुजारी, नागेश चांगले, रतिकांत तोळणुरे, जगदेव दसाडे, अवधूतसिद्ध कोटे, इंद्रजीत माने आणि पतसंस्थेचे व्यवस्थापक राजशेखर बंडगर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष अश्विनी हत्तुरे यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळाच्या सहकार्याने प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




No comments:
Post a Comment