सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेकडून सेवानिवृत्त शिक्षक आणि गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान
शिक्षक पतसंस्थेनी राबवत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद - उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर
सोलापूर :- सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेकडून सेवानिवृत्त शिक्षक सत्कार आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक पतसंस्थेनी राबवत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सोलापूर महानगर पालिकेचे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी प्रतिपादन केले.
सुरुवातीला कै. चं. का. कोळशेट्टी सरांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, महेश देवकर, प्राथमिक वेतन पथक अधिक्षक भरत कासले,शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव राजेंद्र कोरे(कोल्हापूर) शिक्षक महासंघाचे जिल्हाअध्यक्ष अरविंद गावडे( सांगली),पतसंस्थेचे चेअरमन कल्लप्पा फुलारी, व्हाईस चेअरमन रमेश बेडगे, सचीव महादेव होमकर, खजिनदार शोभा चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
पतसंस्थेकडून सर्व मान्यवरांचे मानाचा फेटा,शाल,सोलापूरी चादर,पेन आणि पतसंस्थेचे स्मृती चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.16 सेवानिवृत सभासदांना मान्यवरांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, पूर्ण आहेर, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी, बारावी,शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना परितोषिके देऊन गौरव करण्यात आले.वार्षिक सर्वसाधारण सभेस वेळेवर येणाऱ्या सभसदाना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे पाच कोटीची संचित मुदत ठेवीची रक्कम ओलांडलेली, स्वभांडवलावर चालणारी,स्थापने पासून अ ऑडीट वर्ग असलेली, संगणकीयकृत असलेली, स्वताची इमारत असलेली, कमी व्याज दराने 50 लाखापर्यंत कर्ज आणि संचित ठेवीवर 8.50% व्याज देऊन, 15% लाभांश,7% रिबेट देऊन विविध उपक्रम राबवणारी पतसंस्था असल्याचे चेअरमन कल्लप्पा फुलारी यांनी प्रास्ताविकेत स्पष्ट केले.
वेतन पथकाकडे शिक्षकांचे एक ही प्रश्न प्रलंबीत राहणार नसल्याचे प्राथमिकचे वेतन पथक अधिक्षक भरत कासले यांनी प्रतिपादन करून एक दोन महिन्यात भविष्य निर्वाह निधी चे जमा रक्कम, जमा झालेले व्याज ऑन लाईन मोबाईल मध्ये दिसणार असल्याचे ही आवर्जून सांगीतले.
अरविंद गावडे यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक करून कोळशेट्टी सरांच्या आठवणीना उजाळा दिले.
मयत सभासदांच्या कुटुंबासाठी पतसंस्थेनी नवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करून वेळेवर येणाऱ्या सभासदांना भेटवस्तु देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन शोभा चव्हाण यांनी केले आभार रमेश बेडगे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार शोभा चव्हाण,आरती गायकवाड, जावीरअहमद काझी,निलप्पा वाघोले, निलकंठ पटणे,किरणबाबा गाटे, ऊर्मिला जगदाळे, राजश्री तडकासे आदि संचालकांसह माजी सचिव कृष्णप्पा सालोटगी, कार्याध्यक्ष राजूदास पवार, जिल्हा उपाध्यक्ष महानंदा सोलापूरे, माजी संचालक माणिक आवारे, शिवप्पा
शेतसंदी, महिला आघाडी प्रमुख संगीता शिवपूजे, शहर अध्यक्षा वैशाली कोनापूरे, संगठन मंत्री महादेव वाघोले, सुवर्णा लांबकाने,सतीश पेरमाळ, सिद्राम मायकुंटी आदिनी विशेष प्रयत्न केले.


No comments:
Post a Comment