सारा न्यूज नेटवर्क -
उपमहापौर देवकर आणि शहराध्यक्ष तडवळकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर;
उपमहापौरांना पत्रकार परिषदेचे निमंत्रणच नाही
उपमहापौर ऐनवेळी दाखल, शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद संपल्याचे केले जाहीर
सोलापूर (प्रतिनिधी) :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ५६ विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने सोमवारी महापालिकेतील पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद पार पडली. मात्र, या परिषदेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा रंगली.
पत्रकार परिषद सुरु असताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित नसल्याने पत्रकारांनी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने देवकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.
परिषद संपण्यास अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना देवकर सभागृहात दाखल झाल्या. त्याचवेळी रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर करत, "चला, पत्रकार परिषद संपली... उठा, उठा," असे सांगत उपस्थितांना उठण्याचे आवाहन केले.
गेल्या आठवड्याभरापासून भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यातील मतभेदांची चर्चा सुरु असून सोमवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल व पदाधिकारी उपस्थित होते.
दोन प्रश्नांवरुन वाद -
१. पत्रकार परिषदेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि रोहिणी तडवळकर यांच्यातील वादाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर तडवळकर म्हणाल्या, कोणताही वाद नाही. पक्षाकडून काही सूचना देण्यात आल्या होत्या, त्या उपमहापौरांनी मान्य केल्या असून हा विषय आता संपला आहे.
२. यानंतर पत्रकारांनी उपमहापौरांच्या कार्यालयासाठी नवीन खुर्च्या उपलब्ध करून देण्यास मनाई केल्याच्या चर्चेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर तडवळकर यांनी, नवीन खुर्च्या देऊ नयेत, यासाठी मी नगर सचिवांच्या कार्यालयात कोणताही फोन केलेला नाही. पक्षाच्या शहराध्यक्षा म्हणून नगरसेवकांच्या कामकाजात त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या तक्रारींबाबतही पत्रकारांनी त्यांनाच विचारला.

No comments:
Post a Comment