Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, July 31, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

कासेगाव येथे आज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे यांनी केले. 

दक्षिण सोलापूर : - महाराजस्व अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आज शुक्रवार दि. 31 जुलै 2026 रोजी कासेगाव येथे करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळा, कासेगाव ता. दक्षिण सोलापूर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नागरिकांना विविध महसुली व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.


शिबिरात मिळणाऱ्या सुविधा :

• 7/12 व 8अ मधील चुका दुरुस्ती 

• डिजिटल 7/12 व 8अ चे वाटप 

• तुकडेबंदी नियमितीकरण

 • जमीन वर्ग 1 ची प्रकरणे 

• भूधारणा / कर्ज प्रकरणे निकाली

 • उत्पन्न, जात, रहिवासी दाखले 

• संजय गांधी निराधार व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना 

• ई-मोजणी, पी.एम. किसान, तक्रार निवारण आदी 

या शिबिराचा लाभ कासेगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, बोरामणी गटाचे मा. श्री. नेताजीभाऊ गंगाधर खंडागळे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment