Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, August 31, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



पतीपासून विभक्त असल्याचा फायदा उठवत दीड वर्ष अत्याचार; मंद्रूपमध्ये नराधम जेरबंद.! 


मंद्रूप प्रतिनिधी :- (दक्षिण सोलापूर) 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत, तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या नराधमाला मंद्रूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश संगप्पा वाघमारे रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


लग्नाचे आमिष आणि जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. याच गोष्टीचा फायदा आरोपी प्रकाश वाघमारे याने उठवला. "तू एकटीच राहतेस, आपण दोघे लग्न करू, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला सुखात ठेवीन," असे आमिष त्याने महिलेला दाखवले. मात्र, महिलेने नकार दिला असता, आरोपीने तिला आणि तिच्या मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.


 *दीड वर्षांपासून सुरू होता छळ*

हा काळा प्रकार जानेवारी २०२५ पासून ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सुरू होता. या दीड वर्षाच्या कालावधीत आरोपीने महिलेला वेळोवेळी मारहाण केली, अश्लील शिवीगाळ केली आणि दमदाटी करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंद्रूप पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली.


*पोलिसांनी ठोकल्या बेड्या*

महिलेच्या तक्रारीवरून मंद्रूप पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:५३ वाजता आरोपी प्रकाश वाघमारे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३६१/२०२५, भारतीय न्याय संहिता BNS कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, आणि ६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक API करंडे हे करत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस नाईक PN/५५८ मुल्ला यांनी केले.




No comments:

Post a Comment