Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, February 15, 2025

"भारतीय रेल्वेवरील सर्वोत्तम नवोपक्रमासाठी सूचना योजना" यात मध्य रेल्वेने प्रथम आणि द्वितीय पुरस्कार जिंकला...

 


सारा न्यूज नेटवर्क

"भारतीय रेल्वेवरील सर्वोत्तम नवोपक्रमासाठी सूचना योजना" यात मध्य रेल्वेने प्रथम आणि द्वितीय पुरस्कार जिंकला... 

मुंबई (प्रतिनिधी) :- २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी "भारतीय रेल्वेवरील सर्वोत्तम नवोपक्रमासाठी सूचना योजना" यात मध्य रेल्वेने प्रथम आणि द्वितीय पुरस्कार जिंकला आहे.

पावसाळ्यात मुंबईत उपनगरीय सेवा चालवण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम "पावसाळ्यात पाण्यात डुबलेल्या परिस्थितीत पॉइंट मशीन फेल्युअर्स रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय" प्रदान केल्याबद्दल मध्य रेल्वेने सर्वोत्कृष्ट नवोपक्रमाचे पहिले पारितोषिक जिंकले. विशेषत: पावसाळ्यात बुडालेल्या स्थितीत पॉइंट मशीनचे बिघाड टाळण्यासाठी उपाय शोधण्यासाठी मध्य रेल्वेच्या टीमने केलेल्या अतुलनीय प्रयत्नांकरीता हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे. 



पॉइंट मशीन कव्हरमधील बदल मध्य रेल्वेच्या समर्पित टीमने स्वतः विकसित केला आहे, जो नाविन्यपूर्ण, किफायतशीर आणि व्यावहारिक उपायांबद्दलची वचनबद्धता दर्शवितो. मध्य रेल्वे नेटवर्कमधील विविध पूर-प्रवण ठिकाणी, विशेषतः मुंबई उपनगरीय भागात, हे उपाय लागू करण्यात आले, ज्यामुळे व्यापक सुरक्षा आणि वाढीव विश्वासार्हता सुनिश्चित झाली. पावसाळ्यात पुरामुळे पॉइंट मशीनमधील बिघाड कमी झाल्यामुळे परिचालन कार्यक्षमतेत सुधार झाला. या वाढीमुळे रेल्वेचे कामकाज सुरळीत आणि अखंडित राहण्याची खात्री झाली, ज्यामुळे पॉइंट्स आणि कागदी परवाना (पेपर ऑथॉरिटी) मॅन्युअल क्लॅम्पिंगची आवश्यकता नाहीशी झाली, जी पारंपारिकपणे अशा बिघाडांच्या वेळी आवश्यक होती, ज्यामुळे वेळ लागत होता उपनगरी गाड्यांच्या वेळेवर परीणाम होत होता. पॉइंट मशीन कव्हरमधील बदल अधिक विश्वासार्ह आणि मजबूत रेल्वे पायाभूत सुविधा आणि परिचालन सुनिश्चित करतात.

डब्यांचे नियमित  परीक्षण करून पाण्याची उपलब्धता आणि सुरक्षिततेद्वारे प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी चालत्या डब्यांमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी 'रिअल टाइम वॉटर लेव्हल नोटिफायर सिस्टम' विकसित केल्याबद्दल मध्य रेल्वेने संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट नवोपक्रमाचा द्वितीय पुरस्कार जिंकला.



प्रथम पारितोषिकासाठी ३ लाख रुपये रोख आणि द्वितीय पारितोषिकासाठी २ लाख रुपये रोख बक्षीस आहे.


भारतीय रेल्वेच्या "सर्वोत्तम नवोपक्रमासाठी सूचना योजना" चा उद्देश म्हणजे रेल्वे परिचालनाच्या विविध पैलूंमध्ये व्यावहारिक सुधारणा सुचवणाऱ्या सर्जनशील कर्मचाऱ्यांची ओळख पटवणे आणि त्यांना पुरस्कृत करणे,  त्यांचे मनोबल वाढवणे आणि संपूर्ण नेटवर्कमध्ये उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी किफायतशीर नवोपक्रमांना प्रोत्साहन देते. 


या योजनेचा उद्देश सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना रेल्वे सेवांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

ही योजना तीन पातळ्यांवर कार्यरत आहे: विभागीय/कार्यशाळा, प्रादेशिक/उत्पादन युनिट आणि रेल्वे बोर्ड लेवल.


या पुरस्कारासाठी अंमलबजावणी आणि त्यांची उपयुक्तता दर्शविणाऱ्या नवोपक्रमांचा विचार केला जातो.

ही योजना कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यास, नाविन्यपूर्ण संस्कृतीला चालना देण्यास आणि रेल्वे व्यवस्थेतील विद्यमान आव्हानांवर संभाव्य उपाय ओळखण्यास मदत करते आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचा उद्देश सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नावीन्यपूर्णता आणि सर्जनशीलतेची भावना निर्माण करणे आहे जेणेकरून ते उत्पादकपणे नवीन उपायांची कल्पना करू शकतील आणि त्यांची अंमलबजावणी करू शकतील.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment