Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 18, 2025

भाविकांचे श्रध्दास्थान श्री कमळ भैरव;

 


सारा न्यूज नेटवर्क -  

भाविकांचे श्रध्दास्थान श्री कमळ भैरव;

डोंगरावरील कमळ भैरव मंदीरात माघ पोर्णिमेस पाण्याचा दिवा अखंडीतपणे पेटत राहतो - कुमार माने परिवार मानकरी 

ताकारी /वाळवा(प्रतिनिधी) :-  वाळवा तालुक्यातील ताकारी गावचे ग्रामदैवत श्री कमळ-भैरव देवाची यात्रा बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाली. हे मंदिर परिसरातील भाविकांचे अफाट भक्तीचे श्रध्दास्थान बनले आहे. त्या निमित्ताने...


इंग्रजांच्या काळात दळण वळणाचे माध्यम म्हणून देश भर रेल्वेची निर्मिती केली. सांगली, कोल्हापूर व बेळगावला जाण्यासाठी मुंबई,पुण्यापासून जवळचा मार्ग म्हणून या रेल्वेची महाराष्ट्रात निर्मिती करण्यात आली. या रेल्वे स्टेशनमुळे ताकारी गांव व्यापारी पेठ म्हणून नावारुपास आले. या रेल्वे स्टेशन मधूनच समोर पाहिलेस श्री कमळ भैरव मंदिराचा डोंगर परिसर नयनरम्य आनंद देवून जातो. वाळवा, पलूस व कडेगांव तालुक्याच्या मध्यावर्ती ठिकाणी असलेले इस्लामपूर पासून १५ किमी. अंतरावरील कराड-तासगांव रोडवरील एक छोटसं पण छानसं गाव म्हणजे ताकारी या गावच्या उत्तरेस सागरेश्वर डोंगराच्या रांगा आहेत. याच डोंगर रांगामधील डोंगरावर असलेले पुरातन काळातील मंदिर म्हणजेच श्री कमळ भैरव होय.


यंदा यात्रेनिमित्त बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी गतवर्षी प्रमाणे  डोंगरावरील कमळ भैरव मंदीरात सायंकाळी ०६ वा. १५ मि पाण्यातील दिवा निघाला.

देवा विषयी -

श्री कमळ आणि भैरव हे दोन सख्खे भाऊ असल्याचे बोलले जात आहे. या मंदिराची उभारणी इस. सन ८ व्या शतकात राजा भोज ने केली असल्याचे बोलले जात आहे. राजाभोज यास या कमळ व भैरव देवाची महत्ती समजल्याने त्याने तेथे कमळ भैरव मंदिरा ची उभारणी कोल्हापूर जिल्ह्यातील कारागीराकरवी (नामाजी नागवान तडसरकर) यांनी केली. पुढे सदगुरु सदानंद महाराज होवून गेले ते ज्या दिवशी येथे श्री कमळ भैरव डोंगरावर आले तेव्हांपासून ते दररोज मंदिरा तील मुर्तीची पुजा अर्चा करु लागले तेव्हांपासून या ठिकाणी असणाऱ्या कुंडातील पाण्यानेच दिवा पेटत राही- ला.पुढे काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागले व पाण्याचा दिवा पेटण्याचा बंद झाला मात्र प्रतिवर्षी माघ पोर्णिमेस मात्र हा पाण्याचा दिवा अखंडीतपणे पेटत राहतो अशी अख्यायिका आहे.



हे मंदिर हेमांडपंथी असून मंदिराची उंची ३० ते ३५ फूट आहे. मंदिर पूर्व-पश्चिम आहे. मंदिरात कमळ भैरव अशा दोन स्वतंत्र्य मुर्त्या होत्या मात्र काही वर्षापूर्वी चोरीच्या घटनेने मंदिरात श्री कमळ भैरव अशी एकत्रित मुर्ती तयार केलेली आहे..

* मंदीरातील वर्षभराचे कार्यक्रम दररोज दिवाबत्ती व आरती सकाळी ८ वाजता. * रविवार व सण, उत्सव व पोर्णिमेस भाविकांची तोबा गर्दी.

* श्रावण महिन्यातील दर रविवारी महाप्रसादाचे आयोजन .

* चैत्र महिन्यात प्रतिदिवशी भाविकांकडून दहीभाताचा गारवा.

मंदिराच्या उत्तरेस गुहेमध्ये महादेव मंदिर व तीन थंड पाण्याचे कुंड आहेत. या कुंडात बारमाही पाणी असते हे या ठिकाणचे एक वेगळेच वैशिष्ट्ये आहे. या ठिकाणी माघ पोर्णिमेस देवाची पालखी निघते मंदिर पालखी आल्यावर पुजारी पाण्याचा दिवा पेटवतात तो दिवा तीनशे फूट मंदिराचे पुढे भिवोबा देवाचा राखण्या असलेल्या ठिकाणी आणला.जातो तिथे मावळत्या सुर्याला दाखवून तेथून परत मंदिरात दिव्याची प्रदक्षिणा घातली जाते. या वेळी यात्रेस महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक हजेरी लावत असतात. या मंदिराचे पाठीमागून डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट असून त्यामध्ये वाघबिळ आहे. तेथून वर गेल्यावर किर्लोस्कर पॉईंट असून या ठिकाणावरुन सर्व परिसर नयनरम्य असा दिसतो. तेथून पलिकडे सागरेश्वर अभ्ययारण्य परिसर आहे. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे.

या कमळभैरव मंदिरात जातानाच वाटेवरुन डोंगराच्या पायथ्याशी श्री कमळभैरव यांच्या पादुका असून तेथे सभा मंडप उभारला गेला आहे. तेथून पुढे व डोंगरावर जाताना मध्येच श्री कमळभैरव यांची बहिण सोनाई यांचे छोटेसे मंदीर आहे. या ठिकाणी भाविक विश्रांती घेतात. या डोंगरावर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या व सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या मंदिरातील पुजारी म्हणून ताकारी चे संपूर्ण गुरव कुटुंब हे देवाचे पुजा आर्चा करीत आहेत.


सासनकाठी हे ताकारी  कमळभैरव यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. सासनकाठी चे मानकरी कै.मारुती ज्ञानू माने गाव तुपारी ता. पलुस यांच्या वंशजानी ही परंपरा आजपर्यंत चालू ठेवली आहे 

तसेच खुजगाव ता. शिराळा येथिल माने परिवार यानी ही सासनकाठी ची परंपरा आजपर्यंत चालू ठेवली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment