सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर येथून आंतरराज्य टोळीने चोरलेली स्कार्पिओ राजस्थान बॉर्डर येथून जप्त;
विजापूर नाका डीबी पथकाची दमदार कामगिरी..
सोलापूर (प्रतिनिधी ):- विजापूर नाका पोलीस स्टेशन गु.र.न. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ मधील फिर्यादी आण्णाराव म्हेत्रे घर नं. १२ संत तुकाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर यांच्या घरासमोरून दि. १६/०१/२०२५ रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी चोरी गेलेबाबत म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याचा तपास शितलकुमार गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असुन दाखल गुन्हा उघडकीस आणणेकरीता पोलीस आयुक्त सोलापूर शहर व पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग- २ सोलापूर शहर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकिस आणणेकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड यांना सुचना दिलेल होत्या.
त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे १३५ सी.सी.टी.व्ही. फुटेज १२ ठिकाणचे डम्प डाटा काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करून राजस्थान येथुन आरोपी रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई वय २५ वर्षे, रा. घर नं. १६४ मासोई की ढाणिसिया ता. सांचौर, जिल्हा जालौर, राज्य राजस्थान आरोपी क्र. २ रूपाराम मनाराम बिश्नोई वय ३२ वर्षे, रा. पुनासा, भिनमाल जिल्हा जालौर, राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरी गेलेली महिंद्रा, कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी जप्त केली आहे तसेच गुन्ह्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनी क्रेटा GJ09BK1123 जप्त केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त . एम. राजकुमार पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे सहा. पोलीस आयुक्त वि-२ यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड पोलिस निरीक्षक संगिता पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोहेको/सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोकों/ अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे , स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, हरीकृष्ण चोरमुले व मोबाईल तांत्रिक विश्लेषक/अयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment