सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा "आदर्श पत्रकार दर्पणरत्न" पुरस्कार सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना जाहीर.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर ठाणे येथे होणार सन्मान...
उल्हासनगर (प्रतिनिधी ):- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेल्या पाच वर्षापासून "सारा न्यूज नेटवर्क" च्या माध्यमातून समाजातील रंजलेल्या गांजलेल्या वंचित शोषित पीडित त्याच बरोबर अन्यायग्रस्त लोकांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीचा परखड आवाज प्रशासन दरबारात काढून वंचित पीडित घटकाच्या मूलभूत न्याय हक्कासाठी तसेच पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून खरी खुरी पत्रकारिता जपणारे पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाअध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना उल्हासनगर येथील संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने 2025 चा "आदर्श पत्रकार दर्पणरत्न" पुरस्कार घोषित करण्यात आला.
शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारीला रोजी संत रविदास महाराज चौक, खेमाणी, उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आदरपूर्वक सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करणार असल्याची माहिती संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे यांनी दिली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment