सारा न्यूज नेटवर्क -
रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटी तर्फे रोटरी कम्युनिटी कॉर्प्स (RCC) ची गुळवंची येथे स्थापना..
सोलापूर (प्रतिनिधी) :- रोटरी स्मार्ट सिटी क्लब तर्फे सन 2018-19 मध्ये अध्यक्ष रोटे सत्यम दुधनकर व सचिव नागेश शेंडगे यांच्या कार्यकाळात गुळवंची गावाला स्मार्ट ग्राम संकल्पनेतून दत्तक घेण्यात आले व तेंव्हा पासून गुळवंची गावाच्या सर्वांगीण विकासासाठी क्लब कार्य करत आहे शेंद्रिय शेती प्रशिक्षण, दिव्यांग सायकली वाटप, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण, निराधार महिलांसह भाऊबीज , वृक्षारोपण अनेक उपक्रम रोटरी तर्फे आजवर येथे घेण्यात आले आहेत.
रोटरी कम्युनिटी कॉर्प्स (RCC) हा रोटरी इंटरनॅशनलचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो स्थानिक पातळीवर सामुदायिक विकासाला चालना देतो. RCC हा अशा नागरिकांचा गट असतो, जो रोटरीच्या मदतीने आपल्या गावात किंवा समाजात सकारात्मक बदल घडवतो. रोटरी कम्युनिटी कॉर्प्स
RCC च्या माध्यमातून रोटरी तर्फे केली जाणारी कामे
✅ स्थानिक नेतृत्व विकसित करणे
✅ गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या क्षेत्रात सुधारणा करणे
✅ लोकांना स्वयंनिर्भर बनवणे आणि त्यांना रोटरीच्या सामाजिक प्रकल्पांशी जोडणे
गुळवांची गावातील RCC ची स्थापना ही रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटीसाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नवीन संधी निर्माण होतील आणि लोकांना एकत्र येऊन आपल्या गावासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.
दि 31 जानेवारी 2025 रोजी मेसोनिक हॉल रंगभवन सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटी तर्फे गुळवंची जिल्हा परिषद शाळेला डिजिटल Classroom प्रदान केले व त्या गावाला RCC सर्टिफिकेटही प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीजीएन जयेशभाई पटेल तर व्यासपीठावर अध्यक्ष रविराज दरेकर व सचिव अकबरसाहेब नदाफ उपस्थित होते. प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी गुळवंची ग्रामस्थांकडून सरपंच श्री सुनील जाधव , दादा भोसले , सुहास भोसले , सोमनाथ पवार , भैरवनाथ इंगळे इत्यादीची उपस्थित होती. कार्यक्रमाला संबोधित करताना जयेश पटेल यांनी सांगितले की रोटरी हे नांव एक सामाजिक बांधिलकी आहे.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी सोलापूर स्मार्ट सिटीचे पदाधिकारी प्रा. बसवराज बिराजदार, नागेश शेंडगे, योगीनाथ कुडते, अनिल चंडक, विठ्ठल वंग्गा, इकबाल बागवान आदीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात सूत्रसंचालन महेश साळुंके यांनी केले तर कार्यक्रमाची माहिती सत्यम दुधनकर यांनी दिली व आभार प्रदर्शन अकबर साहेब नदाफ यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment