Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 13, 2025

अक्कलकोट तालुकयातील गुरववाडी येथे ग्रामदैवत श्री शिलवंती देवीची यात्रा उत्साहात साजरी.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

अक्कलकोट तालुकयातील गुरववाडी येथे ग्रामदैवत श्री शिलवंती देवीची यात्रा उत्साहात साजरी.

 अक्कलकोट(प्रतिनिधी) :- मौजे गुरववाडी, तालुका अक्कलकोट येथे भारत (माघी) पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत श्री शिलवंती देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.

 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून प्रसिद्ध महाराजांच्या डोळीन गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यामध्ये श्री मधुगोंड महाराज आणि बसवन संगोळगी यांचा सहभाग होता.

यात्रेत श्री रायणा पुजारी उटगी तालुका, जत. जिल्हा, सांगली यांच्याकडून सुप्रसिद्ध गायन सादर करण्यात आले. गुरववाडीचे सरपंच विकासरत्न माळप्पा पुजारी यांच्या हस्ते हार घालून तो फेटा बांधून सत्कार करण्यात आला. म्हाळप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली  विशेष पुजारी यांच्या सोबत श्रीमंत पुजारी गुड्डद,सायबना हाळखेड,इरप्पा उडगी,विजय मोती या  सहकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.



दि.13 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजता श्री शिलवंती देवीची भव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी प्रसिद्ध महाराज हेळीकी संपन्न झाली.

दरम्यान याप्रसंगी श्री शिलवंती देवी मंदिरात परगावाहून आलेल्या भावी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी गावातील भक्त मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment