सारा न्यूज नेटवर्क -
कामशेत ता.मावळ येथे संत रविदास महाराज यांची 648 वी जयंती अभूतपूर्व अशी साजरी करण्यात आली.
या जयंती सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला गेला...
कामशेत/पुणे (प्रतिनिधी) :- समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंती सोहळा संत रोहिदास समाज सेवा संघ मावळ तालुका व संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहर यांच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला.
संत रोहिदास समाज सेवा संघ मावळ तालुका / संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ / संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहर यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
सकाळी ७ वाजता संत रोहिदास महाराज यांच्या अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सत्यनारायण महापूजा व होमहवन करण्यात आले.
संत रोहिदास महाराज यांची ज्योतीचे 11वाजता आगमन झाले संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे मोठ्या थाटामाटात पालखीत बसवून ढोलताशांच्या गजरात महाराजांची मोठ्या भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष जेष्ठ मंडळी व लहान बालगोपाल मंडळीनी सहभागी झाले व मोठ्या उत्साहात कामशेत शहरातून संत रविदास महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर सभामंडपात भक्तीमय वातावरणात ह.भ.प.प्रकाश महाराज जाधव ( कार्ला ) यांचे प्रवचन रूपी सेवा झाली. सर्व भक्तगण मंडळींनी प्रवचनाचा लाभ घेतला. त्यानंतर सर्व महिलांचा मावळ तालुका व कामशेत शहर कार्यकारिणी यांच्या वतीने हळदीकुंकाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. महाप्रसादाचा आस्वाद सर्व शहरवासीयांनी आनंदाने व भक्तीभावाने घेतला.
सायंकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात सात वाजता रामायणचर्या शिवचरित्र कथाकार ह.भ.प. राजेंद्र महाराज वाघमारे यांच्या किर्तन रूपी सेवेने झाली. यावेळी सर्व लहान थोर मंडळी व महीलांनी या किर्तनाचा भक्तीभावाने आस्वाद घेतला. त्यानंतर पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला.
अशा प्रकारे श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी पणे करण्यात आले यासाठी सर्व कामशेत मावळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी पणे करण्यात आले यासाठी सर्व पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचे यांचे अभिनंदन व स्वागत सत्कार करण्यात आले.
मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधव भगिनी यांनी मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घेतला व मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडला.
संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संत रोहिदास समाज सेवा संघ मावळ तालुका / संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहर व मावळ तालुका महिला व कामशेत शहर महिला कार्यकारिणी यांनी यशस्वी पणे केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment