Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 2, 2025

ठाण्याच्या कौटुंबिक न्यायाधीशपदी अँड. अमित आळंगे यांची नियुक्ती...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

ठाण्याच्या कौटुंबिक न्यायाधीशपदी अँड. अमित आळंगे यांची नियुक्ती... 

सोलापूर(प्रतिनिधी) :- येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अमित आळंगे यांची ठाण्याच्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी ते पदभार घेणार आहेत.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षे वकिली केल्यानंतर अँड. अमित विश्वनाथ आळंगे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेतून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमधून घेऊन त्यांनी पुढे तेथेच बी.एस.एल.एल.बी.चे शिक्षण घेतले.

अमित यांना आपले वडील अँड. विश्वनाथ आळंगे यांच्याकडून वकिलीचे बाळकडू मिळाले. २००८ पासून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला.

सध्या ते सोलापूर जिल्हा न्यायालय येथे दिवाणी फौजदारी कौटुंबिक, ग्राहक मंच, शाळा न्यायाधिकरण, ट्रस्ट न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वडील अँड. आळंगे यांनी हे १९८० ला सुरू केलेल्या आळंगे लॉ क्लासेसमध्ये २००८ पासून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. ते वकिली व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

सोलापूर बार असोसिएशनमध्ये ते खजिनदार व सचिव झाले. अनेक शासकीय, प्रशासकीय, खाजगी नामवंत संस्थांवर पॅनल अँडव्होकेट म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोलापूर बार असोसिएशन येथे विक्रमी मतांनी निवडून येऊन सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मान मिळवला. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उपक्रम राबविले. सध्या ते लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा बार असोसिएशनतर्फे निरोप समारंभ पार पडला.

जिल्हा न्यायाधीश म्हणून कुटुंब व्यवस्था बळकट करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आजच्या समाज व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात देखील त्यांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे अँड. अमित आळंगे यांचे ठाम मत आहे. यासाठी प्रत्यक्ष कृतीतून कार्य करत त्यांनी पोलिस अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गुन्ह्यातील पीडितांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला दिला असून अनेक कायदेविषयक जनजागृती शिबिरातून मार्गदर्शन देखील केले आहे.

अँड. अमित आळंगे यांनी सोलापुरातील विधीसेवा प्राधिकरण, सोलापूर महापालिका, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व सिद्धेश्वर देवस्थान, गोकूळ शुगर, सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, कंचेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर सेकंडरी स्कूल, एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटी अशा अनेक संस्थांवर पॅनेल अँडव्होकेट म्हणून काम केले आहे. पैसे कमविणे हा प्रमुख उद्देश न ठेवता अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मोठे यश मिळाल्याचे अँड अमित आळंगे म्हणाले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment