Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 2, 2025

सोलापुरातुन चोरलेली कार सापडली धुळ्यात; सहा मोटारसायकलीसह आठ गुन्हे उघडकीस : गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी...


 सारा न्यूज नेटवर्क

सोलापुरातुन चोरलेली कार सापडली धुळ्यात;

सहा मोटारसायकलीसह आठ गुन्हे उघडकीस : 

गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी... 

सोलापूर (प्रतिनिधी) : - शहरातून चोरीला गेलेली कार धुळे येथून हस्तगत करण्यात आली आहे. शिवाय शहरातील सहा मोटारसायकली व दोन मोटर पंप असे एकूण आठ गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

४ जानेवारी रोजी नई जिंदगी मजरेवाडीच्या मोकळ्या जागेत दुचाकी विक्री करीता थांबलेल्या निशांत बापू बनसोडे (वय १९ रा. अवंतीनगर भाग-१) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या. १२ जानेवारी रोजी ताणा-बाणा चौक ते वल्याळ मैदानाकडे जाणाऱ्या रोडवर अंधारात चोरीची मोटारसायकल घेऊन एकजण थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने जाऊन संशयिताकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव विशाल आनंद ढेरे (वय २० रा. मड्डी वस्ती, तुळजापूर नाका मूळ रा. वडजी पो बोरामणी ता. दक्षिण सोलापूर) असे सांगितले. त्याच्या कडून दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. 

पथकाने गस्ती दरम्यान संशयित अक्षय अमोल कदम (वय ३० रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे एक मोटारसायकल मिळून आली. जी त्याने बनावट चावीने चोरली होती. 24 जानेवारी रोजी कारचा शोध घेण्यासाठी धुळे येथे गेले असता,तेथे अभिजीत दिलीप चव्हाण (वय 30 रा. मेन रोड चव्हाण ज्वेलर्स बाजार पेठ, बालाजी मंदिर जवळ. पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे) याच्या कडून कार हस्तगत केली. 

भंगारवाल्याकडून जप्त केल्या दोन मोटारी

जमीर अब्दुल रहेमान पैरमपैली (वय ३९ रा. कुर्बान हुसेन, तालुका पोलिस ठाण्याच्या समोर) याच भंगारवाल्याकडून चोरीतील दोन मोटार पंप हस्तगत केले. त्याच्याकडे २०२३ मध्ये दोन अनोळखी तरूणांनी मोटारी विकल्या होत्या.

यांनी पार पाडली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त एम.राज. कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड, पोलिस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, बाळू काळे यांनी पार पाडली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment