सारा न्यूज नेटवर्क -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा महावितरण ला इशारा...
कामशेत (प्रतिनिधी) :- मनोरमा नगर भागातील नागरिकांच्या महावितरण बाबतीत असलेल्या वेग वेगळ्या तक्रारी तसेच विविध प्रलंबित मागण्या घेऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोरमा नगर शाखेच्या वतीने MSEB महावितरणच्या कोलशेत विभागाचे वरीष्ठ अभियंता अनिल म्हस्के यांची भेट घेऊन खालील विषयांवर निवेदन दिले.
१. मनोरमा नगर विभागात उन्हाळ्यात वीज खंडित होण्याचं प्रकार घडतात त्याबद्दल उन्हाळ्या आधीच उपाययोजना कराव्यात असे नाही झाल्यास जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला.
२. जीवन संग्राम मैदान येथील ट्रान्सफॉर्मेर च्या सुरक्षित कंपाऊंड ची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.
३. जीवन संग्राम मैदान ते ज्योतिब मंदिर पर्यंत टाकलेल्या विद्युत वाहिनीला उघड्यावर न ठेवता खड्डा करून आतमध्ये पुरण्यात यावे जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही.
यावेळी उपशहर प्रमुख संतोष शिर्के, शाखाप्रमुख अनंत जाधव, शाखाप्रमुख सागर ढवळे, युवासेना पदाधिकारी अनिकेत मोहिते, अंकुश रुद्रपे उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे जाणुन घेतले आणि संबंधित विभागाला करवाई करण्यास कळवले त्याबद्दल त्यांचे शाखाप्रमुख यांनी आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment