Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 2, 2025

टाकाऊ वस्तु पासून पक्ष्यांसाठी केले फिडर तयार... पक्ष्यांची शाळा पक्ष्यांचा संख्या वाढवण्यासाठी धडपड.




सारा न्यूज नेटवर्क - 

 टाकाऊ वस्तु पासून पक्ष्यांसाठी केले फिडर तयार...

पक्ष्यांची शाळा पक्ष्यांचा संख्या वाढवण्यासाठी धडपड...

सोलापूर (प्रतिनिधी) :- अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या चिमणी, सूर्य पक्ष्यांना मदत करण्यासाठी फिटर लावले पण पक्षी फिरकत नव्हते. घरासमोरील परिसरात झाडे लावून हे परिसर हिरवागार केल्यानंतर पक्षी येऊ लागले. आणि फिटर मधील गोड पाणी पिऊ लागले. एकत्व सोशल फाउंडेशन बाळे. चे सदस्य ऋषिकेश हरसुरे. फिटर करण्याकरता त्यांचं देखील योगदान राहिले..

घरातील वस्तू पासून. चिमणी, सूर्यपक्षी, बुलबुल, कावळ्यांसाठी, फिटर तयार केले. घरासमोरील परिसरात स्थानिक प्रजातीची झाड, वेली, लावून त्याचे संवर्धन केले, घराच्या परिसरासमोर एका सूर्यपक्ष्यांची जोडी. आणि चिमणी अन्नाच्या शोधात फिरत असण्याचे दिसले. त्या पक्ष्यांसाठी अन्नाची सोय करण्यासाठी धडपड सुरू झाली....


 🔳फिटरसाठी घरगुती आणि टाकाऊ साहित्याचा केला वापर..

पक्ष्यांची त्याची उंची वजन पायाचे नाजूक तळवे आणि आपण फुलातून सदृश पाणी ओढून घेता येईल असे डिझाईन तयार केले. रिकाम्या पाण्याचे बॉटल चे झाकण. मिडीयम साईजचा पुष्टा चे तुकडे आणि दोन पुष्टा पासून तयार केले फुलं. चित्रकलेला वापरणारा कलर. आईच्या बांगड्याचा वापर केला आहे. स्वच्छ पाणी उकळून गार करण्यात आले. एक लिटर मध्ये पाव किलो साखर टाकून पाणी चमचाद्वारे बाटलीच्या झाकण मध्ये ठेवण्यात येतो दिवसातून किमान आठ वेळा ठेवण्यात येते. हा फिटर म्हणजे टाकाऊतून टिकाऊ संकल्पनचे अप्रतिम उदाहरण आहे. दिवसभरात घरच्या परिसरात पक्ष्यांची वर्दळ असते. त्यासोबतच एका छोट्याशा मातीचा भांडी यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, इत्यादी धान्य ठेवण्यात येते. पाण्याच्या शोधात आलेल्या पक्षांना अन्न चे देखील सोय केल्याने परिसरात किलबिलाट सुरू झाला आहे.


🔳परिसरात झाडे नसल्याने पक्षी येत नव्हते...

सुरुवातीला म्हणावे तितके पक्षी येईनात तेव्हा लक्षात आलं की आजूबाजूला. झाडच नाहीत. पक्षी कसे येणार घराजवळच्या परिसरात. आपटा, सुरगी, वरूण, फुलपाखरू ला आकर्षण करण्यासाठी. विविध प्रकारचे फुलांचे झाड लावली. काही महिन्यातच सगळीकडे हिरवाई दिसायला लागली. आणि पाठोपाठ या परिसरात पक्षीही आले. खूप आनंद झाले असे दीपक करकी यांनी सांगितले..

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment