सारा न्यूज नेटवर्क -
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत नेत्र शिबिर व आरोग्य शिबिर संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र रोग शिबिर व आरोग्य शिबिर दिनांक 18/2/2025 मंगळवार रोजी घेण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय"," जय भवानी जय शिवाजी" या घोषणा देण्यात आल्या.
शिबिर 18/02/2025 रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान घेण्यात आले. यात जवळपास शंभर नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉक्टरांनी नागरिकांच्या नेत्र व आरोग्य तपासणी करून त्यांना नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले व मोफत औषधे देण्यात आली.
या वेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल चे अध्यक्ष गोवर्धन सुंचु हे उपस्थित होते या वेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बीजेपी चे माजी नगरसेविका विजयाताई वडेपल्ली, श्रीकांत बोराडे. अशोक लोंढे सर, शशिकांत मेजर उकरंडे, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते निरंजन बोंध्दुल. मातंग समाज ज्येष्ठ नेते हनुमंतु पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे सदस्य बाळासाहेब लोंढे, रितेश शिंदे, नंदकिशोर दिडवानी, सामाजिक कार्यकर्ते नाना रमंपुरे यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment