सारा न्यूज नेटवर्क -
जातीच्या दाखल्यासाठी लागणारी ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- शिक्षणासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा दाखला असून अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढत असताना १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची मागणी संबंधित यंत्रणा कडून केली जाते. ज्यामध्ये अनेक ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो सध्याच्या घडीला १९५० वर्षापूर्वीचा पुरावा असणे व सादर करणे कठीणच आहे. त्यामुळे सदरील पुरावा नसल्यास जातीचा दाखला मिळणे म्हणजे फार मोठे अडचणीचे ठरत आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्या अभावी प्रवेश घता येत नसल्याने विशेष करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? अश्या अनेक प्रश्न विद्यार्थीनां भेडसावत असून मोठ्या मानसिक त्रासाला व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. १९५० वर्षा पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात आली यावी तसेच जातीचा दाखला त्यांच्या पालकांचा (वडिलांचा) असल्यास त्या दाखल्याच्या आधारावर ग्राह्य धरून त्या विद्यार्थी तथा पाल्याला १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची सक्तीचा न करता जातीचा दाखला देण्यात यावा जेणेकरून देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि होणारा मानसिक त्रास कमी होईल त्याचबरोबर शिक्षणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. जिल्हाधिकारी साहेबांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून जातीच्या दाखल्या बाबतची 50 वर्षांपूर्वी च्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी अश्या मागणी चे निवेदन पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून दिले आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे संघटक सादिक शेख शहर जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान शहराध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद मोहसीन बागवान साप्ताहिक कार्यसम्राटचे पत्रकार वैभव राऊत पत्रकार सुरक्षा समितीचे महेश मेटकरी इम्रान आत्तार मुजमिल काखंडकीकर इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment