सारा न्यूज नेटवर्क -
जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिराचा 21 वा वर्धापन.
दोन दिवस सोहळा,पालखी मिरवणूक,दीपोत्सव,देवी महात्म्य यावर व्याख्यान,महाप्रसाद ..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापूर शिवगंगानगर भाग दोन येथील संतोषी माता मंदिराच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त 3 व 4 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात पालखी सोहळा, दीपोत्सव , कुंकूमार्चन, होमहवन, महाआरती होईल. तीन ते चार हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आहे. ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षणमहर्षी ए. जी. पाटील यांनी या मंदिराची स्थापना 21 वर्षापूर्वी केली आहे. सुबक व तेजस्वी मूर्ती पंढरपुरातून आणून स्थापना केल्याचे सांगण्यात आहे. वर्षभरात मंदिरात देन कार्यक्रम मोठ्या स्वरुपात साजरे होतात. मंगळवार ता. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा ते अकरा होमहवन, महाआरती, दुपारी बारा ते चार यावेळेत महाप्रसाद आहे.
संतोषी माता मिरवणूक, पालखीचे आयोजन:
सोमवार 3 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता संतोषी माता पालखी मिरवणूक निघेल. युवाशक्ती चौक, कोणार्क नगर, जगदीश मंगल कार्यालय, संतोषनगर, लक्ष्मी मंदिर, गोविंदश्री मंगल कार्यालय, दोंदेगर ते मंदिर असा मार्ग आहे. सायंकाळी सात वाजता कुंकूम अर्चना होईल. यानंतर 'देवी महात्म्य' प्रा. भीमाशंकर बिराजदार यांचे व्याख्यान आहे.
धार्मिक सोहळा, महाप्रसादाचा लाभ घ्या
- सिद्धेश्वर पाटील, मंदिर प्रमुख
21वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली. धार्मिक सोहळ्यात सहभाग नेवार, महाप्रसाद सेवेचा लाभ घ्यावा. देवी कृपा आशीर्वाद प्राप्त करावा
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment