सारा न्यूज नेटवर्क -
खुजगांव ता.शिराळा येथे श्री संत रविदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी;
प्राथमिक आरोग्य केंद्र कोकरुड यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
शिराळा / सांगली (प्रतिनिधी) :- समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त श्री संत रविदास महाराज युवा मंडळ खुजगांव व संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाैंडेशन महाराष्ट्र राज्य विभागाच्या वतीने जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री संत रविदास महाराज यांची जयंती दिनांक 13/02/2025 रोजी श्री संत रविदास महाराज युवा मंडळ खुजगांव व संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाैंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मु.पो.खुजगांव तालुका शिराळा.जि सांगली येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थापक अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. संत रविदास महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांच्या मनोगतातून सर्व समाज बांधव भगिनी यांना सांगितली.
कार्यक्रमाला उपस्थित श्री संतोष चाैधरी महाराष्ट राज्य संघटक,श्री.परशुराम माने राज्य सचिव,सांगली जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग कारंडे.सांगली जिल्हा सचिव श्री दादासो माने,शाहुवाडी तालुका अध्यक्ष श्री उमेश कारंडे,खुजगांव गावचे ग्राम सेवक श्री.अमोल लक्ष्मण कुभांर,सरंपच श्री राहुल पाटिल,उप-सरंपच श्री सागर सावंत,ग्रांम पचांयत सदस्य नथुरान सावंत,माजी डेपोटी श्री धनाजी सावंत.ग्रांमपचायंत चे सर्व सदस्य.व पोलिस पाटील जयदिप गुरव हे सर्व पदाअधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमा निमित्ताने प्रांथमिक आरोग्य केंद्र कोकरुड प्रमुख यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. त्यावेळी डॅा एस.टि जाधव वैदिकीय अधिकारी, डॅा विनोद पवार सी एच ओ, डॅा वाय सी जमादार, आरोग्य सायक व्ही वाय चव्हाण, आरोग्य सेवक पि एस कदम, एस बी कुभांर, आरोग्य सेविका श्रीमती एस एस संधे, आषा-मणिषा कांबळे,अजंना जाधव,उज्वला पाटील,रंजना म्होपरेकर,रूपाली सावंत, लॅब स्टाफ श्री प्रकाश बाळु सावंत व इतर सर्व स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरात ब्लडप्रेशर,शुगर,वजन, उंची,CBC,ब्लड ग्रुप,थायरॅाड,TT इंजेक्शन,असे विविध प्रकारच्या एकुण २० प्रकारच्या तपासण्या घेण्यात आल्या.
या शिबिरात महिला,पुरुष,लहान मुले, जेष्ट नागरिक, अंगणवाडी शिक्षीका,मदतनिस, प्रांथमिक शाळेतील शिक्षक शिक्षीका व ग्रांमपचायत मधील संरपच,उपसरंपच सदस्य तसेच गांवातील सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचा १००ते १५० लोकांनी लाभ घेतला. शिबिराचे आयोजक संत रविदास महाराज युवा मंडळ खुजगांव चे पदाधिकारी श्री.दादासो माने,मनोहर माने,ओंकार माने,सुभाष माने,अरुन माने,नितीन माने,महेश माने,संदीप माने,सिद्धार्थ माने,तानाजी माने,योगेश माने,किरण माने,परशुराम माने अशोक वसंत माने,चंद्रकांत माने,सुरज माने,प्रनव माने,सचिन माने,ओंकार माने,सुधाकर माने,प्रथमेश माने, राकेश माने,अतिश माने असे सर्व जन उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment