सारा न्यूज नेटवर्क -
संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य स॑स्थापक अध्यक्षा सौ श्रध्दाताई शिंदे यांना ग्राहक योद्धा पुरस्कार प्रधान...
भिलारेवाडी (प्रतिनिधी) :- दिनांक २२ रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 या दोन दिवस जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन आर्यन वर्ड स्कूल भिलारेवाडी येथे संपन्न झाले.
अधिवेशनात स्व.बिंधूमाधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्कार २०२५ सोहळा घेण्यात आला.
इस्लामपूर मधील समाजसेविकास सौ श्रध्दाताई अतुल शिंदे यांना ग्राहक योद्धा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना समाजातील वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनाराष्ट्रीय अध्यक्ष दिलीप फडके या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जवळकर , पोलीस प्राधिकरणाचे विभागीय अध्यक्ष जटाले, ह्यूमन राइट्स चे विकास कुचेकर, अजित वाराणशिवार याशिवाय अन्य पाच जणांनी मार्गदर्शन केले.
या अधिवेशनासाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, चंद्रपूर,नाशिक,लातूर व यवतमाळ इत्यादी जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment