सारा न्यूज नेटवर्क -
"सारा न्यूज नेटवर्क" ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदी गजानंद उत्तम लिंबोंरे यांची नियुक्ती..
तळागाळातील वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करणार - गजानंद लिंबोंरे
सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली दोन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे.
सारा न्यूज नेटवर्कच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदी गजानंद उत्तम लिंबोंरे यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नावाची घोषणा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी आज केली आहे.
गजानंद लिंबोरे यांचे मुख्य संपादक राम हुंडारे व सहसंपादक मनोज देवकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीने समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment