Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 17, 2025

मुस्लिम मावळ्यांच्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छता प्रसाधने किटचे वाटप..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मुस्लिम मावळ्यांच्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छता प्रसाधने किटचे वाटप..

जे.पी सोशल फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम.. 

सोलापुर (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे.पी सोशल फाउंडेशन च्या वतीने कुमठा नाका येथील श्री बालाजी मतीमंद मुकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते स्वच्छता प्रसाधने किटचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मिठाई देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती धर्मातील मावळ्यांना एकत्रित करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले यामध्ये मुस्लिम मावळ्यांचाही मोठे योगदान होते जे पी फाउंडेशनच्या माध्यमातून मुस्लिम मावळे एकत्र येऊन शिव विचारांची शिवजयंती साजरी करतात हे खरंच अभिमानास्पद आहे असे मनोगत व्यक्त केले. 


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष श्याम  कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून युथ प्राइड चे समीर भाई, शेख शहानवाज(पत्रकार)शेख, वसीमसाब शेख, शाहनवाज आणि कंपनी, जमीर सालार, फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिस भाई शेख, रियाज अत्तार, जिलानी शेख.प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मोहसीन जमादार, मोशीन भाई  सचिन कांबळे, डिके भाई, मोहसीन शेख, इसाक शेख, फिरोज सय्यद अधि उपस्थित होते

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केली कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक फाउंडेशनचे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment