Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 27, 2025

विरशैव कक्कया नागरी पतसंस्था सोलापूर येथे वीरशैव कक्कया महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...


 सारा न्यूज नेटवर्क - 

विरशैव कक्कया नागरी पतसंस्था सोलापूर येथे वीरशैव कक्कया महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी... 

सोलापूर (प्रतिनिधी) :-  सोलापूर शहरातील नवीन नावारूपाला येत असलेल्या व जनतेच्या विश्वासार्ह असणार्‍या विरशैव कक्कया नागरी पतसंस्था सोलापूर या पतसंस्थेच्या कार्यालयात "वीरशैव कक्कया महाराज" यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. 




या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून - 

सौ सुलोचनाताई सोनवणे/महाडीक (समाज कल्याण उपायुक्त)

श्री रमेश सोनवणे ( अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक समिती सोलापूर )

श्री चाबुकस्वार ( संत रोहिदास महामंडळ ), 

श्री दशरथ कसबे ( मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष ) 

श्री राम हुंडारे ( जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती व संपादक - सारा न्यूज नेटवर्क) 

समाजातील सर्व बंधू-भगिनी ज्येष्ठ नागरिक समितीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. 




विरशैव कक्कया नागरी पतसंस्था सोलापूर 

चेअरमन - श्री जितेंद्र नारायण होटकर 

संचालक मंडळ - श्री सुरेश कटकधोड, श्री संतोष बोराडे, श्री गिरजप्पा कटकधोड,श्री सिद्धेश्वर शिंदे, श्री मधुकर कदम, श्रीमती सुनंदा इंगळे,सौ कांता होटकर,श्री मनीष होटकर इत्यादी उपस्थित होते. 



संत कक्कया महाराज यांच्या विषयी :

लिंगायत संप्रदाय व वचन साहित्य रक्षक ,अस्पृश्यता, विषमता ,वर्णव्यवस्था, जातीभेद ,वर्णभेद, लिंगभेद, काल्पनिक स्वर्ग- नरक, कर्मकांड, व्रतवैकल्य, उपास-तापास ज्योतिष्य, भविष्य ,पंचांग, यज्ञ ,हवन, पुरोहित हस्ते पूजा यांचा कडाडून विरोध करणारे, सदाचार ,नीती,

 स्वकष्ट, मेहनत ,परिश्रम, समाजसेवा ,शिक्षण, नैतिकता, विवेक, सामाजिक क्रांती ,स्त्री-पुरुष समान हक्क व समतेचे पुरस्कर्ते, दया हाच एकमेव धर्म मानणारे, मानव जात हीच एकमेव जात असल्याचा आपल्या वचनातून प्रचार -प्रसार करणारे, सदाचार म्हणजे स्वर्ग! अनाचार म्हणजे नरक! हे अनुभव मंडपातून  पटवून सांगणारे ,बाराव्या शतकात जातीविहीन समाज रचनेची चळवळ जागविणारे, समाजात माणूस म्हणून जगण्याचे तत्त्वज्ञान मांडणारे, वचन साहित्यिक, प्रतिभावंत, वचनकार, थोर महाज्ञानी, सच्चे समाज सुधारक, महात्मा बसेश्वर यांचे प्रामाणिक शिष्य, झुंजारू, लढाऊ, शूरवीर योद्धे


 वीरशैव शरण संत कक्कया महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना व संपूर्ण विश्वातील सर्व मानवतावादी समाजबांधवांना हार्दिक- हार्दिक शुभेच्छा.!

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment