Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, February 21, 2025

समर्थ नगर उत्सव समिती (दिवा)आयोजित "शिव जन्मोत्सव सोहळा" उत्साहात साजरा...



सारा न्यूज नेटवर्क - 

 समर्थ नगर उत्सव समिती (दिवा)आयोजित "शिव जन्मोत्सव सोहळा" उत्साहात साजरा... 

दिवा (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हटले की, महाराष्ट्र राज्याचा 'मोठा सणच' आहे असे आता भारतातील सर्वच राज्यांनी मान्यच केले आहे. याच पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या माझी नगरसेविका सौ.दिपालीताई भगत आणि मा.उमेश अशोक भगत (शिवसेना,दिवा पूर्व,विभाग प्रमुख) यांच्या आयोजना खाली दिवसभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 




सकाळी 10:00 वाजता गणेश पूजन व शिवप्रतिमा पालखी पुजनापासुन ते रात्री 8:00 वाजता हरी किर्तन सेवा (ह.भ.प.श्री.रोशन महाराज महाडिक) यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाने शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी भगत या दाम्पत्यांच्या नियोजना खाली गणेश पूजन व शिवप्रतिमा पालखी पुजन करण्यात आले तर,

 गणेश प्रासादिक भजन मंडळ (बुवा,सुनिल परब) यांनी सुमधुर आवाजात भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच शिवजयंती निमित्ताने जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा करण्यात आला तसेच शिवजयंतीच्या सोहळ्यात शिवभक्तांनी पारंपारिक वेषभूषेचा पेहराव करूण अधिकच शोभा वाढवली लहान मुलासाठी छाया चित्रणही ठेवण्यात आले.विशेष म्हणजे, मोठ्या उत्साहाने मा.उमेश भगत आणि सौ.दिपालीताई भगत यांच्या मार्गदर्शना खाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची पालखीतून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण समर्थ नगरला प्रदर्शना घालत मिरवणूक काढली.


सदर कार्यक्रमा मध्ये सर्व राजकीय पक्षाच्या वा सामाजिक संघटनेच्या स्थानिक नेत्यांनी,कार्यकर्त्यांसह बचतगटातील महिलांनी तसेच लहान मुला,मुलींनी आपला सहभाग नोंदवला. 



हा शिवजन्मोवत्सवाचा कार्यक्रम मोरेश्वर विघ्नहर्ता गणपती मंदिर, समर्थ नगर,ठाण,दिवा (पूर्व) येथे साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका सौ.दिपालीताई भगत आणि उमेश भगत (शिवसेना,विभाग प्रमुख दिवा पूर्व) यांच्या शाखेतील सर्व उप विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,शिवधुत आणि महिला मंडळ तसेच कार्यकर्ते या सर्व शिलेदारांनी यशस्वी केला.

शब्दांकन -- सूर्यकांत कदम,दिवा पूर्व, उपविभाग प्रमुख

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment