सारा न्यूज नेटवर्क -
कार्लीचे ग्रामसेवक विनोद बोरकर यादीमध्ये नाव असूनही घरकुलाचा लाभ देण्यास टाळाटाळ;
कार्ली ता.वाशीमच्या खुळे दांपत्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार..
वाशीम (प्रतिनिधी) :- प्रमिला गजानन खुळे (आदिवासी) रा. कार्ली वाशीम ता.वाशीम यांचे प्रधानमंत्री घरकुल योजना ची यादी मध्ये नाव असून ही घरकुल योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रारी अर्ज प्रमिला गजानन खुळे व त्यांचे पती गजानन सिताराम खुळे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी वाशीम यांना केला आहे.
गजानन खुळे हे वडीलांनी दिलेल्या कौलारू च्या झोपडी मध्ये 2000 सालापासून रहात आहेत. ते रहात असलेले कौलारू घर त्यांच्या वडीलांना 1986 साली इंदिरा घरकुल योजनेतून मिळालेले आहे. खुळे दांपत्य यांना 2010 मध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजने अंतर्गत विज जोडणी देण्यात आली होती.
त्यांनी केलेल्या तक्रारी अर्जांमध्ये, ग्रामपंचायत कार्ली चे ग्रामसेवक विनोद बोरकर हे घरकुलाचे यादीमध्ये नाव असून लाभ देण्यास टाळाटाळ करत असून वारंवार आठ-अ बदलत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या अर्जाची व्यवस्थित छाननी न करता घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार खुळे दांपत्याने जिल्हाधिकारी वाशीम यांच्या कडे केली आहे.
अर्जात पुर्वीचे सर्व शासकीय लाभ मिळाल्याचे नमूद केले आहे. व योग्यतो न्याय मिळवून देण्याकरिता अर्ज सादर केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment