Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, February 8, 2025

श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सव 2025, कामशेत

 


सारा न्यूज नेटवर्क - 

श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सव 2025, कामशेत; 

सत्यनारायण महापूजा,पालखी मिरवणूक, प्रवचन, किर्तन, जेष्ठ नागरिक सत्कार व महाप्रसादाचे आयोजन... 

पुणे /कामशेत (प्रतिनिधी):-  दरवर्षी श्री संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही ता. मावळ जि.पुणे येथील देवराम कॉलनी,कामशेत येथील श्री संत रोहिदास समाज सेवा मंदिर येथे मिती माघ पौर्णिमा शके १९४६ बुधवार दिनांक १२/०२/२०२५ रोजी संत रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सव 2025 दिनानिमित्त 12 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील.



जयंती उत्सवातील कार्यक्रमाची रूपरेषा :

सकाळी ७ ते सकाळी १० वा.

श्रीची महापूजा, अभिषेक, होमहवन, सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद

सकाळी १० ते ११ वा

श्री संत रोहिदास महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक


सकाळी ११ ते १२: वा

ह.भ.प प्रकाश महाराज जाधव (कार्ला) वांचे प्रवचन

दुपारी १२ ते १२:३० या

मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा भव्य सत्कार समारंभ

दुपारी १२:३० ते १ वा

मावळ तालुका महिला कमिटी व कामशेत शहर महिला आघाडी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम

दुपारी १ ते ३ वा : महाप्रसाद

सायं ५ ते ६.०० वा :

ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार समारंभ


सायं ७.०० ते ९.००या;

रामायणचर्या शिवचरित्र कथाकार ह.भ.प राजेंद्र महाराज वाघमारे यांचे कीर्तन 

मृदुंगमणी : ह.भ.प. संतोष महाराज घनवट व शिष्य वर्ग

गायक : ह.भ.प सागर महाराज भदे, ह.भ.प प्रवीण महाराज केदारी, ह.भ.प सागर महाराज पडवळ,

ह.भ.प विजय महाराज गायखे

कीर्तन साथ : ओम चैतन्य वारकरी संप्रदाय समिती मावळ व भैरवनाथ भजनी मंडळ कुसगाव खुर्द

रात्री ९:३० : भोजन

रात्री १० ते १ : श्री दत्तगुरू भजनी मंडळ, दत्त कॉलोनी कामशेत यांचा भजनाचा कार्यक्रम..


वरील जयंती उत्सव व कार्यक्रम खालील सामाजिक संस्थाच्या सहभाग व पुढाकाराने संपन्न होत आहे. 

१) संत रोहिदास समाज सेवा संघ तालुका अध्यक्ष - रमेश लक्ष्मण मानकर 

२) संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ तालुका अध्यक्ष - दिनेश धोंडीबा जाधव

३) संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहर अध्यक्ष - रमेश मारूती शिंदे 

४) तालुका महिला अध्यक्षा - रेश्मा आमोल मानकर 

५) कामशेत शहर महिला अध्यक्ष - गौरी अमोल शिंदे

मावळ तालुका सर्व गावातील श्री संत रोहिदास तरुण मंडळ. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment