सारा न्यूज नेटवर्क -
भिवंडी शहरातील ज्येष्ठ पत्रकार मोहन राठोड यांची व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड...
भिवंडी (प्रतिनिधी): भिवंडी शहरातील ज्येष्ठ पत्रकार मोहन राठोड यांची व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी भिवंडीतील सानोबर हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते जनमंदिर' या साप्ताहिकाचे यशस्वी संपादन करत असून, त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत कल्याण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या विशेष प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगल डोंगरे, कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे तसेच तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे, ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी मोहन राठोड यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मोहन राठोड यांचे कामगिरी व त्यांची संघटनेप्रती काम करण्याची जिद्द पाहून शहराध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. दैनिक, साप्ताहिक, मिडिया या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सर्व मान्यवरांना एकत्रित करून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची प्रगती कशी करण्यात येईल यावर त्यांचे लक्ष केंद्रित असणार आहे. असे मोहन राठोड यांनी या निवडीनंतर सांगितले. संघटनेने त्यांच्यावर जी जबाबदारी सोपविली आहे ते योग्य रित्या निभावतील व संघटनेकडून झालेली निवड ही सार्थ करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment